प्रेम काय असत हे माहीत नव्हत,
प्रेमात कस पडतात ते माहीत नव्हत,
प्रेम हा मुळात आपला विषयच नव्हता,
मग त्यात पास होण्याचा प्रश्नच येत नव्हता..
तिच्या अबोल हसण्याला मी काय नाव देऊ,
डोळ्यातल्या भावनांना कसे जाणून घेऊ,
तिच्यवर खरेच प्रेम केले, हे तिला पटवून कसे देऊ…


तुझ्या प्रत्येक सुखात भागीदार व्हायचं ...
तुझ्या प्रत्येक दुखात तुझा आधार व्हायचं .....
तुझ्या प्रत्येक श्वासातला श्वास व्हायचं .....
तुझ्या प्रत्येक ठोक्यातील भाग व्हायचं... ...
तुझ्या मनातील वेदनांचे मलम व्हायचेआहे.....
देवा जवळच्या प्रार्थनेतील मागणं व्हायचं... .
तुझ्या अंधारलेल्या जीवनातील दिवा व्हायचं... ..
तुझ्या डोळ्यातील स्वप्न व्हायचं 
तुझ्या हसण्याचे कारण व्हायचे आहे....
श्वासाच्या शेवटल्या क्षण
पर्यंत तुझ व्हायचं...
प्रेम हे जिवनासाठी आहे ,
पण जिवन हे प्रेमासाठी नाही,
प्रेम हे जिवनात असु शकते,
पण जिवन प्रेमात असु शकत नाही ,
प्रेमात जिवन वाया घालवू नका ,
पण जिवनात प्रेम करायला विसरु नका



पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे...
तु एकदा हा बोल मग
आपली साता जन्माची गाठ आहे...



प्रेमात पडलं की असच होणार..!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच
चेहरा दिसणार,
स्वप्नात सुध्धा आपल्या
तिच व्यापुनउरणार
येता जाता उठता बसता,
फक्त तिचीच आठवण होणार
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार..!

बोलताही येत नाहीआणि
लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगताही येत नाही
पहिले जेव्हा तुला फक्त
तुलाच बघत राहिलो
फक्त तुलाच पहावे असेच
दिनक्रम करत राहिलो
... खरच तुझ्या नादाने मी
स्वता लाच हरवत राहिलो
काय करू प्रेमाचा ताज
महल्ला सजवीताही येत नाही
बोलताही येत नाही आणि
लपविताही येत नाही

तुला पाहिलं त्याक्षणापासून ,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो...
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो...!!

मुले  असतातच असे
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,
ती आपली होऊ शकत नाही
हे माहीत असून
फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे...
मुले असतातच असे.
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात
पाहण्यासाठी सतत
निस्वार्थी प्रयत्नात असणारे..
खरच काही मुले असतातच असे
माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील
स्वताला विसरून
त्यात आपले प्रेम शोधणारे.!!

खरं प्रेम म्हणजेतडजोड
करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे
एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली
मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे भांडण
करुन परत जवळयेणे.
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द
न उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात
फक्त आनंदाश्रु असणं


कविता करणे सोपं कि प्रेम ?
कविता चुकली तर
कागद फडता येतो
पण
प्रेम चुकले तर 
आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.....
जाताना एकदा तरी नजर वळवून जा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा,
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा फुलवून जा,
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून जा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा


विसरण्यासाठीच तुला आता, मि खूप काही करत आहे..
विसरूनच जाईन तुला, असंच पक्क मनीशी ठरवत आहे.
पण नकळत कुठून एक झुळूक वाऱ्याची येते.
स्पर्शून या वेड्या मनाला वाहवत नेते.
पुन्हा तुझ्याच स्वप्नांत, गुंतवून मला जाते..
ठरवलेलं पक्क मनाशी. मनातच राहते.
अन् पुन्हा, आठवणींची तुझ्याच, अखंड साखळीच सुरु होते.

"जेव्हा मी मोठा होईन
आणि माझी मुलगी मला विचारेल
कि, " बाबा, तुमचे पहिले प्रेम
कोण होत" ?
... तेव्हा मला कपाटातून जुने
... फोटो काढून दाखवायचे
नाही आहेत, मला फक्त
माझा हाथ वर करून बोटाने
दाखवायचे आहे कि, "ती किचन
मध्ये उभी आहेना तीच माझे
पहिले आणि शेवटचे प्रेम आहे " ♥


ओठाना जे जमत नाही ते
फूल बोलतात,
मनातल्या भावना ते
रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर
मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात
खरचं किती आनंद असतो...!


प्रेम करणं सोपं नसतं...
प्रेम करणं सोपं नसतं...
सर्व करतात, म्हणून
करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून
करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून
करायच नसतं....
तर कुणाकडून ऐकलं,
म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...

जीवन मिळते एकाचं वेळी......
मरणं येतं एकाचं वेळी...
प्रेम होतं एकाचं वेळी...
ह्रदय तुटतं एकाचं वेळी...
सर्व काही होतं एकाचं वेळी...
तर तिची आठवण...
का..?. येते वेळो वेळी..


प्रेम हृदयातील एक भावना..
कुणाला कळलेली..
कुणाला कळून न कळलेली..
कुणी पहिल्याच भेटीत
उघड केलेली..
तर कुणी आयुष्यभर लपवलेली...
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली..
तर कुणाची गंमत झालेली..
कुणाचे आयुष्य उभारणारी..
तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी..
फक्त एक भावना.


सगळ्याच गोष्टी
सांगायच्या नसतात
त्या न सांगता समजतात
... ... ज्या गोष्टी न सांगता
समजतात
अगं वेडे त्यालाचं तर
प्रेम म्हणतात

ती असावी मनात
आणी सतत विचारात
आठवण कधी आली तर
यावी समोर क्षणात
कधी रुसणारी कोपरयात
कधी हसणारी गालात
स्वच्छन्द बागडणारी आणी कधी
मला ठेवणारी भानात
अशीच यावी आयुष्यात
होउन एक नवी
पहाटदवबिन्दुसम निरागस ती अन्
तशीच रहावी माझ्या मनात...


जाता जाता तुला सांगुन जातोय
माझ तुझ्यावर प्रेम आहे
तुझ्याशिवाय माझे जगणेच व्यर्थ आहे ....
माहित नाही तू माझी होशील की नाही
पण तुझ्याशिवाय जीवनात दुसरे कोणी असणार नाही ....
माहित नाही काय होईल
कधाचित आयुष्भर एकटे राहने माझ्या नशिबी राहिल .....

प्रेम करतो हे सांगण,
तसे अगदी सोपे आहे,
पण खरे प्रेम निभवण,
आहे खूप कठीण,
बोलायला तर लोक,.....¤ ¤
सहजच बोलून जातात ,
... वेळ येते निभवण्याची खरी,
तर म्हणतात आपल्यात,
आता दुरीच बरी....... ..!!

जीवनात नेहमी हसत रहावं 
कधी रडू नये,
त्यासाठी एवढेच करावे कि
 कधी प्रेमात पडू नये
माझं स्वप्न आहे, तुझ्यासोबत जगण्याचं,
हातात हात घेऊन,एकाच दिशेन
चालण्याचं, माझं स्वप्न आहे,तुला
जवळून पाहण्याचं,
जवळ तुला घेऊन,एकदा मिठीत घेण्याचं,
माझं स्वप्न आहे,तुझ्या सोबत राहण्याचं,
... छोठसं घरट बांधून,त्यात दोघांनीच राहण्याचं,
माझं स्वप्न आहे,तू स्वप्न बघण्याचं,
आणि दोघांनी मिळून,ती पूर्ण करण्याचं,
माझं स्वप्न आहे,मी चित्र रेखाटण्याचं,
त्यात रंग भरून,ते तू रंगवण्याचं

मागून कोणालाच कधी मैत्री मिळत नाही 
वठलेल्या फांदीवर फुल कधी उमलत नाही 
ज्याला लोक जमवलेली मैत्री म्हणतात 
त्यांच्या डोक्यात फक्त फायद्याचे हिशोब असतात
कोण आहे सचिन तेँडुलकर...? ? ?

●► मायकल क्लार्क - अशी क्षमता असलेला एक माणुस जो एकाच प्रकारचा चेँडु पाच वेगवेगळ्या क्षेत्रात मारु शकतो.

●► सर डॉन ब्रॅडमन - त्याच्या खेळाच्या शैलीत मी माझी सावली पाहिली आहे.

●► वसिम अक्रम - हा खेळाडु तर देवाचे वरदान आहे.

●► ब्रायन लारा - सर्व क्षेत्रातील एक सर्वोत्कृष्ठ फलंदाज.

●► ब्रेट ली - महान जागतिक सुपरस्टार.

●► मॅकग्रा - असा खेळाडु तुमच्या बाउंसरला पण षटकार खेचु शकतो.

●► शेन वॉर्न - माझं रात्रीच संकट.

●► स्टीव्ह वॉ - जश्या सर्व योजना सचिनसाठीच बनलेल्या असतात.

●► रिकी पॉँटिग - स्ट्रेट ड्राईव्ह चा प्रतिभावान खेळाडु.

झाडाचं प्रत्येक पान हे गळत असत
गळताना ते नेहमी सांगत असत, 
कोणावर कितीही प्रेम केल तरी, 
शेवटी कुणीच कुणाच नसत.
एकदा दोरा म्हणे मेणबत्तीला,
अंधारात मंदपणे उजळताना,
"का ग अशी रडतेस,
पाहुन मला जळताना?"
मेणबत्ती म्हणे..,
"दुःख होतं मनस्वी
पाहुन तुला पोळताना.
हृदयात सामावून
घेतलं ज्याला, त्याचंच आयुष्य जाळताना..

तुझ्या बंधनात अडकून प्रेमात तुझ्या पडायचं आहे 
तुला मिळविण्यासाठी जगाशी या लढायच आहे
तुमच्या पायात बूट नाहीत म्हणून दुखी होऊ नका 
कारण कितीतरी लोक असे आहेत 
ज्यांच्याकडे बूट आहेत 
मात्र ते घालायला पाय नाहीत.
जेव्हा तुमची जवळची व्यक्ती 
तुमच्यावर रागवायची बंद होते 
किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा 
परिणाम होत नाही. 

तेव्हा समजुन जा..

 तुम्ही त्यांच्या आयुष्यातली 
महत्वाची जागा गमावलीत

विसरव म्हंटल तरी विसरता येत नाही,
दिवस येतात जातात पण मन कुठंच लागत नाही,

पाउस पडून गेला तरी आभाळ मोकळे होत नाही ,
आठवण आली नाही असं कधी झालंच नाही,
आठवायला विसरव लागत 
विसरता मात्र येत नाही
कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं, 
दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं, 
जीवन यालाच म्हणायचं असतं, 
दुःख असुनही दाखवायचं नसतं, 
अश्रुंनी भरलेल्या डोळयांना पुसत आणखी हसायचं असतं.

कधीतरी मन उदास होते 
हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते 
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा ... 
आपली माणस दुर असल्याची जाणीव होते .
कॉलेज लाईफ म्हणजे ; 
८ मित्र...२ बाईक्स....पण पेट्रोल नाही...!!! 

कॉलेज लाईफ म्हणजे ; परीक्षेच्या आगोदर ची रात्र...६ जिगरी मित्र....पण नोट्स नाहीत...!!!

 कॉलेज लाईफ म्हणजे ; 
कॉलेज चं बॅक गेट...५ मित्र....पण एकच सिगरेट...!!! 

कॉलेज लाईफ म्हणजे ; 
१ मुलगी....६ मित्र....आणि प्रत्येकाचं सांगणं,'तुझी वहिनी आहे...' !! 

कॉलेज लाईफ म्हणजे ; 
 ते जिगरी मित्र....त्या गप्पा- गोष्टी... .आणि आयुष्यभराच्या आठवणी...'!!!
भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे

जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला

निरोप तुला देतांना अश्रू माझे वाहतील
काळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून नेतील

त्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब तुझेच असेल
नीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात माझा दिसेल

वाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे नाही
प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे नाही

आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार नाही
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे सोडणार नाही

जातेस पण जातांना एवढे सांगून जाशील का?
भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील का?

जाता जाता थोडे तरी मागे वळून पाहशील का?
प्रत्येक्षात नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का?

बोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल
गोंधळलेल्या अंत:कर्णाची खबर मला सांगेल

कोठेतरी हृदयात इतिहास सारा आठवशील
तो आठवण्या पुरता तरी, तू नक्कीच माझी राहशील!

नजरेने जरी ओळखलेस तू, शब्दांनी मी बोलणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ आणणार नाही

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शप्पत सांगतो पुन्हा प्रेम करणार नाही......

हसण्याची ईच्छा नसली .. 
तरी हसावे लागते ..
कसे आहे विचारले तर .. 
मजेत म्हणावे लागते .. 
जिवन एक रंगमंच आहे .. 
ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते..!
आयुष्यातील आठवणी
 चित्रात उतरवता आल्या असत्या.. 
तर किती बर झालं असतं.. 
चित्रात स्वतःच स्वतःला तुझ्याशि 
कायमच जोडून घेतल असतं...
आयुष्यात घडलेल्या चुका 
पुसता तरी आलं असतं... 
दूर जाणे इतके दुखावतं तर ... 
जड झालेलं आयुष्य 
हवं तेव्हा संपवता आलं असतं...
इतरांच्या पावलांवर चालण्यापेक्षा असे काही करा की लोकं तुमच्या पावलांवर चालतील.

 किती क्षणाचं हे आयुष्य असत,
आज असत तर उद्या नसतं,
  म्हणुनचं ते हसत हसत जगायचं असतं,
कारण इथे कोणीच कुणाच नसत,…..!!!

 जाणारे दिवस जात असतात,
येणारे दिवस येत असतात,
  जाणारांना जपायचं असत,
येणारांना घडवायच असत,
  आणि जिवनाच गणित सोडवायच असत!!

म्हणुनच, कधी कुणासाठी तरी जगायचं असत.

अरे विचार काय करतोस,
काहितरी करून दाखव..
वेळ जाईन निघून,
प्रवाहामध्ये तरून दाखव..
लाखो आले अन गेले,
बोल घेवडे सगळे..
स्व:ता काही नाही केले,
फ़क्त लोकाना उपदेश दिले..
उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ..
सत्याची कास धरून तर बघ..
कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं..
एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ..
यश आपल्याच हातात असतं रे..
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ..
होशील खुप मोठा,
स्व:तावर विश्वास ठेवून तर बघ..

आयुष्य हे चहाच्या कप सारखे असतं..  
चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असतात. 
अवती भोवती पाहता हळूच 
चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते,, 
अरेच्या! साखरच घालायला विसरलो कि काय... 
पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही
 कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस  पडते ती, 
कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर.... 
आयुष्य असच असतं... 
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात, 
त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे
हे नेहमी अस्स्सचं का होतं
जे ठरवलंय, नेमकं त्याच्या उलटं घडतं..
भूक लागते जोरदार, तेव्हा नसतो जेवायला वेळ
परीक्षा असली की चालू होतो लोड -शेडिंग चा खेळ..
Important फोन करायचा असेल तर मिळत नाही Range
1000/- चे सुट्टे करायला गेलो तर कोणी देत नाही Change....
दोन मराठी माणसे भेटली तरी बोलतात मात्र 'हिंदी'
Email Account काढायची Process का असते खूपच 'Lengthy'....
5 रु . चा समोसा Multiplex मध्ये का होतो रुपये वीस
Important कामाच्या वेळी फास्ट लोकल का बरे होते मिस्स्स....
पावसाळा आहे माहीत असून, पाऊस आल्यावर का येते चीड..?
योगायोगाने एखादी पोरगी आवडलीच तर असते ती 'Just Married'
समजत नाही हे नेहमी अस्स्सचं का होतं
जे ठरवलंय, नेमकं त्याच्या उलटचं का घडतं..!!!
जीवनाच्या प्रत्येक वळणावर 
आठवण येत राहील. 
एकत्र नसलो तरी 
सुगंध दरवळत राहील
कितीही दूर गेलो 
तरी आपले हे नाते 
आज आहे तसेच उद्याही राहील.

कुणीतरी विचारले तिला...,  " तो " कुठे आहे....??  
हसत उत्तर दिले तिने .... 
 माझ्या श्वासात...,  माझ्या हृदयात..., 
माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात 
तो आणि फक्त तोच आहे....  
यावर पुन्हा विचारले गेले मग..., 
" तो " कुठे नाही......??  
तिच्या ओल्या डोळ्यांनीच तिचे उत्तर दिले...  
" माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात...." ♥♥♥
चालणारे दोन पाय किती विसंगत असतात
एक मागे असतोएक पुढे असतो,
पुढच्याला अभिमान नसतो,
मागच्याला अपमान नसतो,
कारण यांना माहित असतं
क्षणात हे बदलणारं असतं
याचच नाव जीवन असतं.

हरवलेल्या गोष्टींच्या शोधात वेडे मन इतके धावले की 
गवसलेल्या गोष्टींचा पायाखाली चुराडा झाल्याचे कळलेही नाही. 
काही तुडवलेल्या गोष्टींना इतका तडा गेला आहे 
की कुठला तुकडा कोणाचा हे सुद्धा आता ओळखू येत नाही. 
सहवासाच्या खेलामाधल्या आठवणी आहेत मागे 
आसवांच्या ओंजळी शिवाय हाती काहीच न लागे .


  
रस्त्यात जर एखादे मंदिर दिसले 
तर प्रार्थना केली नाही तरी चालेल ..
पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहिका जात असेल 
तर प्रार्थना जरूर कर..
कदाचित कोणाचे प्राण वाचतील
जिवन हे एक गणित आहे... 
लग्न त्याची बेरीज आहे...
प्रेम त्याची वजाबाकी आहे...
संसार त्याचा भागाकार आहे... 
मुले त्याची गुणाकार आहे...
आखेर मृत्यू त्याचे उत्तर आहे...
पूर्ण होणार नाही म्हणुन स्वप्नच ब घायच नाही का ..,...? 
आपण कधी आवडीने जीवन जगायच नाही का ......?
स्वप्न जरुर बघाव आणि जीवनही जरुर जगाव कारण ..... 
 स्वप्नांमुळेच तर आपल जीवन जगण्यायोग्य बनत असत 
 उद्या कशासाठी जगायच हे स्वप्न मधुन ठरत असत...

प्रेम कस असत ते मला बघायचंय 
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेत तर प्रत्येक जन जगतो ,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचं